महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील
तरतुदीनुसार 'ग्रंथालय संचालनालय' या स्वतंत्र विभागाची 2 मे, 1968 रोजी करण्यात आली आहे. ग्रंथालय
संचालनालयाकडून खालील कार्ये केली जातात.
1) राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता प्रदान करणे आणि तदर्थ व परिरक्षण अनुदान देणे.
2) सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या प्रोत्साहनार्थ योजना तयार करणे.
3) राज्य मध्यवर्ती ग्रंथा लयापासून विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामपातळीपर्यत ग्रंथा लयांचे व ग्रंथालय सेवांचे
जाळे निर्माण करणे.
4) राज्यात प्रसिध्द झालेल्या मराठी ग्रंथांची वर्गीकृत वार्षिक ग्रंथसूची तयार करणे.
5) राज्यातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचा संग्रह जतन व संवर्धन करणे.
6) शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासास उत्तेजन देणे.
7) राज्य ग्रंथालय निधीतून सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान मंजुर करणे.
8) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य पुरविणे.
9) राज्य ग्रंथालय परिषदे गठित करण्यासाठी सदस्यांची नावांची शासनास शिफारस करणे.
10) राज्य ग्रंथालय परिषदेचे आयोजन करणे.
11) नवीन ग्रंथालये स्थापन्यास मार्गदर्शन करणे.
12) ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देणे.
13) समाजा त वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळीचे संवर्धनाच्या प्रयोजनार्थ पुढील नमूद केलेले पुरस्कार
राज्य शासनाकडून ग्रंथालय संचलनालयामार्फत दरवर्षी प्रदान केले जातात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गाच्या ग्रंथालयांना पुरस्कार.
- डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक पुरस्कार
वरील सर्व कार्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 च्या तरतुदीस अधीन राहून केली जातात.