राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम ( ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन )

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सुरुवात ग्रंथप्रदर्शनाने करण्यात आली. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्र. ग्रंथालय संचालक श्री. अशोक गाडेकर यांचे हस्ते करण्यात आले.

ग्रंथप्रदर्शन दि. 1 जानेवरी 2025 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत शासकीय सुटटया वगळून सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. इच्छुकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीम. शालिनी इंगोले यांनी केले आहे.