विकिमिडीया कॉमन्सच्या साथीने सयाजी संशोधन पर्वातील नवा मानदंड प्रस्थापित...
सस्नेह नमस्कार! महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा विविध अंगाने आढावा घेणारे, मूळ कागदपत्रांचा आधार घेऊन निखळ संशोधक
दृष्टीने मांडणी असलेले विश्वसनीय साहित्य 'महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे'ने सर्व समाजासाठी मुक्त करून विकिमिडिया
कॉमन्स या प्रकल्पात उपलब्ध करून दिले आहे. कोणीही आता या साहित्याचा मुक्तपणे वापर करू शकेल, व्यापक प्रसार करू शकेल. काही काळाने हे साहित्य
युनिकोड रुपात विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयात उपलब्ध होईल. संस्थेचे सचिव साहित्यिक बाबा भांड आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेचे समन्वयक
सुबोध कुलकर्णी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. नजिकच्या काळात सयाजीराव गायकवाड यांच्यावरील समग्र अर्काइव्ह मुक्त स्वरुपात विकसित करण्याचा संकल्प
या दोन संस्थांनी केला आहे. हे साहित्य मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
महाराजा सयाजीराव गायकवाड | सयाजी संशोधन पर्वातील नवा मानदंड