राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम ( वाचन कौशल्य कार्यशाळा )

दि. 06 जानेवारी 2025 रोजी "वाचन कौशल्य कार्यशाळा" आयोजित करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी श्री. अशोक गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, श्री. शशिकांत काकड, प्र.ग्रंथालय उपसंचालक व यंग लेडीज हायस्कूल, मुंबईच्या विदयार्थीनी, शिक्षिका श्रीम.उषा वर्मा, श्रीम. सुजाता महाजन, श्रीम. वर्षा शिंदे यांच्यासह इतर वाचक मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार देशमुख, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थांना ग्रंथ भेट देण्यात आले.