डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवकासाठी `डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार' देण्याची अभिनव योजना सन 1992-93 पासून सुरू केलेली आहे. त्यामध्ये आदर्श कार्यकर्ता व सेवक राज्यस्तर प्रत्येकी -1 प्रमाणे व प्रत्येक महसूल विभागातून 1 कार्यकर्ता व 1 सेवक असे एकूण 14 पुरस्कार दिले जातात. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावाने राज्यातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यासाठी राज्यस्तरावरून रू. 25,000/- व विभागस्तरावरून रू. 15,000/- अशी रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभा बरोबरच पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी विहित अटी पूर्ण करणारी ग्रंथालये प्रस्ताव सादर करू शकतात.

सुरुवातीस हा पुरस्कार राज्यस्तरावरुन प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकता व सेवक यांना दिला जात होता. शासन निर्णय क्र. मराग्रं/1002/(491)/साशि-5, दिनांक 10 एप्रिल, 2003 अन्वये सन 2002-03 पासून राज्यस्तरावरील कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु.25,000/- तसेच राज्यातील प्रत्येक महसुल विभाग स्तरावर एकेक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु.15,000/-, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. यासाठी राज्यभरातून ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांचे अर्ज सहाय्यक ग्रंथालय संचालकांमार्फत मागवून ते ग्रंथालय संचालकांकडे पाठविण्यात येतात. त्यासाठी ठरवलेल्या निकषांनुसार प्रस्तावांना गुणांकन करुन ते निवड समितीपुढे सादर करण्यात येतात. याबाबत सन 2011-12 या वर्षापासून गुणांकनाच्या निकषांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.


विभागीय स्तरावर सहाय्यक ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावित व्यक्तींच्या कार्याची प्रत्यक्ष पहाणी करुन ग्रंथालय संचालकांकडे प्रस्ताव अभिप्रायांसह शिफारीत करतात. डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कारासाठी कार्यकर्ता व सेवक यांची निवड अंतिमत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीकडूनच करण्यात येते. समिती एकमताने पुरस्कार योग्य व्यक्तींची निवड करते.

मराठी
 • भारत सरकार
 • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
 • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
 • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
 • रोजगार बातम्या
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग
 • डिजिटल भारत
 • आधार कार्ड
 • आपले सरकार
 • डिजिटल लॉकर
 • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली