जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर

1) पार्श्वभूमी :-

“महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967” अधिनियमातील प्रकरण 4 कलम 11 अन्वये राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करण्यात येते. याशिवाय शासनास आवश्यकता भासेल, अशा स्थानिक क्षेत्रामध्ये शासनाचे ग्रंथालय स्थापन करण्याची तरतूद आहे. शासनाच्या मुंबई शहर, सातारा, बीड व नांदेड या चार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांच्या धर्तीवर 11 व्या पंचवार्षिक योजनेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र. मराग्रं 1003/(15/03)/साशि-5, दि. 6 फेब्रुवारी, 2004 अन्वये जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहमदनगर या कार्यालयाची स्थापना करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

1.1) पदनिर्मिती :-

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र. मराग्रं 2008/(641/08)/ साशि-5, दि. 27 एप्रिल, 2009 अन्वये या कार्यालयाकरिता आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार या कार्यालयासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे अनुक्रमे 1) जिल्हा ग्रंथालय अधिकारी, 2) तांत्रिक सहाय्यक, 3) कनिष्ठ लिपिक, 4) शिपाई अशी एकूण 04 पदे मंजूर आहेत.

1.2) स्थापना :-

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहमदनगर या कार्यालयाची स्थापना अहमदनगर त्रिवेणी, कोट कॉलनी, पंपिग स्टेशन रोड, महालक्ष्मी उदयानाजवळ, भुतकरवाडी, अहमदनगर-414 003 येथे दिनांक 01 फेब्रुवारी, 2010 रोजी करण्यात आली.
.
2) उद्दिष्टे :-

1) ग्रंथालयीन सेवा देणे.
2) कला व संस्कृती जोपासणे व टिकविणे.

2.1) ग्रंथालय/कार्यालयाची ठळक वैशिष्टे :-

1) नवीन ग्रंथ संपादित करणे.
2) जिल्हयातील लेखंकांचे साहित्य संपादितत करणे.
3) युवकांसाठी स्पर्धापरीक्षा दालन.

3) ग्रंथालयाची/कार्यालयाची वेळ :-
सकाळी 9.45 ते सायं. 5.45
(दुस-या व चौथ्या शनिवारी व प्रत्येक रविवारी ग्रंथालय बंद राहिल.)

4) ग्रंथालय/कार्यालयाची कार्ये :-

4.1) आस्थापनाविषयक कार्ये :- दैनंदिन कामे, गोपनिय पत्रव्यवहार इ.

4.2) तांत्रिक कार्ये :-

4.2.1) व्यक्तिगत सभासद व संस्था सभासद बनविणे.
4.2.2) ग्रंथप्रदर्शन, व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे इ. आयोजन करणे.
4.2.3) वाचकांना पुस्तक देवाण-घेवाण करणे इ.
4.2.4) ग्रंथांची नोंद दाखल नोंदवहीत घेणे.
4.2.5) ग्रंथ सोपस्कार करणे इ.

4.3) आर्थिक कामे :-

राज्य व जिल्हास्तरावरून आर्थिक निधी मिळविणे व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीसाठी प्रस्ताव बनविणे, बैठकांना हजर रहाणे, कार्यक्रम अंदाजपत्रक (चारमाही/आठमाही) पाठविणे इ.

4.4) इतर कामे :-

4.4.1) जड वस्तूसंग्रह नोंदवही, रोकड वही इ. अद्ययावत ठेवणे;
4.4.2) मासिक अहवाल, तांत्रिक कामाचा अहवाल पाठविणे;
4.4.3) ग्रंथालयाचा परिसर स्वच्छ व आल्हाददायक ठेवणे, खेळती हवा व पुरेसा प्रकाश व्यवस्था ठेवणे इ.
4.4.4) माहिती अधिकारी व इतर अहवाल ग्रंथालय संचालनालय (मुख्यालयास) पाठविणे.

5. ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी यांची नावे, संपर्क क्रं. व ई-मेल :-

1) श्री. सु. नि. मुंढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी
मो. 94203 52271

2) श्री. कै. अं. विसपुते, तांत्रिक सहाय्यक
मो. 99224 46260

3) श्री. सं. कुं. वाघचौरे, निरीक्षक

4) श्री. सं. र. देशमुख, वरीष्ठ लिपिक

5) श्री. प्र. बा. ढगे, कनिष्ठ लिपिक
मो. 98226 53983

5.1) कार्यालयाचा दुरध्वनी क्रं. /फॅक्स क्र. :- 0241-2430180

5.2) ई-मेल :- gdistlib.ahamadnagar@dol.maharashtra.gov.in

6) ग्रंथालय विभाग :-

6.1) आस्थापनाविभाग
6.2) संदर्भ विभाग
6.3) स्पर्धा परीक्षा विभाग
6.4) वृत्तपत्र/नियतकालिके विभाग
6.5) अभ्यासिका इ.

7) ग्रंथालय सेवा :-

7.1) संदर्भ सेवा
7.2) वृत्तपत्र/नियतकालिके सेवा
7.3) वृत्तपत्र कात्रण सेवा
7.4) नोकरी संदर्भ मार्गदर्शक सेवा

8) सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी :-

8.1) ग्रंथ प्रदर्शन
8.2) ग्रंथ महोत्सव
8.3) कौमी सप्ताह
8.4) कार्यशाळा
8.5) व्याख्याने
8.6) चर्चासत्रे इ.

9) ग्रंथालयाचे नियम :-

9.1) संचानालयाने दिलेल्या निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार ग्रंथालयात येणा-या वाचंकाना ग्रंथालयशास्त्राच्या 5 पाच नियमांनुसार ग्रंथालयीन सेवा देणे.
9.2) ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे.
9.3) ग्रंथालये ही कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सायं 5.45पर्यंत) उघडे रहातील.
9.4) ग्रंथ जपून वापरावे.
9.5) वाचकांनी ग्रंथालयात शांतता ठेवावी.
9.6) वाचकांनी आपल्या किमती वस्तू जसे, भ्रमणध्वनी, दागिने, द्रव्य इ. स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावेत.
9.7) ग्रंथालयात भ्रमणध्वनी बंद ठेवावा.
9.8) ग्रंथालय ही आपली संपत्ती म्हणून समजावी.
9.9) वाचकांशी सौजन्याने वागावे.

10) ग्रंथालय सभासद :-

1. व्यक्ति सभासद (अनामत रु.100/- व वर्गणी रु.20/- (दोन वषांर्साठी)
2. संस्था सभासद (अनामत रु.500 व वर्गणी रु.150 (दोन वर्षांसाठी)
3. व्यक्ति सभासदांना 01 ग्रंथ 14 दिवसांसाठी देण्यात येईल.
4. संस्था सभासदांना 25 ग्रंथ 30 दिवसांसाठी देण्यात येतील. सदर ग्रंथ घेवून जाणे व परत करण्याची जबाबदारी संस्थेची राहील.

***************
मराठी
  • भारत सरकार
  • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
  • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
  • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
  • रोजगार बातम्या
  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • डिजिटल भारत
  • आधार कार्ड
  • आपले सरकार
  • डिजिटल लॉकर
  • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली