महाराष्ट्र राज्यात प्रकाशित व मुद्रित झालेली ग्रंथ राज्यातील सर्व वाचकांना शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत खरेदी करुन वाचकांना वाचनासाठी उपलब्ध
करुन देणे.
शासन निर्णय, शिक्षण व समाज कल्याण विभाग क्रमांक एल आय बी 2562-अ, दिनांक 5 जूलै, 1963 अन्वये ग्रंथ निवड समितीची स्थापना करण्यात आलेली
आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 मधील प्रकरण तीन कलम 9, पोटकलम (2) (अ)(क)(ड) अन्वये करण्यात आलेले महाराष्ट्र
सार्वजनिक ग्रंथालये नियम, 1970 मधील प्रकरण चार, नियम 22 (ब) अनुसूची एक नमुना ब मधील (5) अन्वये सार्वजनिक ग्रंथालय सहाय्यक अनुदानाच्या 50
टक्क्यांपेक्षा कमी नसेल इतकी रक्कम पुस्तकांवर खर्च करील. परंतु, अनुदानाच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी नसेल इतकी रक्कम, त्या वर्षामध्ये संचालकांकडून काढण्यात
आलेल्या, दोनपेक्षा कमी नसतील इतक्या, पुस्तकांच्या याद्यांतील पुस्तके खरेदी करण्यावर खर्च करण्यात येईल, अशी तरतूद आहे.
तसेच दिनांक 25 जानेवारी, 1969 रोजी मा. मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ग्रंथालय परिषदेच्या पहिल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये
मा. श्री. ग.त्र्यं.माडखोलकर यांनी इमारत अनुदान पध्दती, अनुदान संहिता व पुस्तक निवड समिती अशा तीन समित्या नेमाव्यात असे नमूद करण्यात आलेले
आहे. त्या अनुषंगाने शिक्षण व समाज कल्याण विभाग शासन निर्णय क्र. ग्रंवियो 2369/अ, दि. 03/01/1970 अन्वये ग्रंथ निवड समितीची पुर्नरचना करण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.एलआयबी-2390/173309/(1916)/साशि 5, दि. 26 सप्टेंबर, 1995 नुसार ग्रंथ निवड समितीची कार्यपध्दती व
इतर बाबी या विषयाची नियमावली (इंग्रजी ) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येते. त्या अनुषंगाने उच्च व
तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. मराग्रं-2020/प्रक्र-51/2020/साशी-5, दि.20 व 22 जानेवारी, 2021 अन्वये ग्रंथ निवड समिती गठित करण्यात आलेली आहे.
सदर समितीवर 19 अशासकीय सदस्य असून सदर समितीची पहिली बैठक दि. 15 व 16 जुलै, 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर समितीची मुदत
पहिल्या बैठकीपासून तीन वर्ष असून सामान्यत. ग्रंथालये इत्यादी क्षेत्रातील संबंधित तज्ञ असतात, ग्रंथ, शिक्षण, समितीचे सदस्य साहित्य
ग्रंथ निवड समितीमध्ये साधारणपणे पुढीलप्रमाणे सदस्यांच्या निुयक्त्या केल्या जातात.