शासकीय ग्रंथालयांची अंकिय केंद्रे`

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई यांचे डिजिटल उपकेंद्र अंधेरी येथे सन 2009 मध्ये तत्कालिन मा.मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते कार्यान्वित करण्यात आले. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे किमान एक डिजिटल उपकेंद्र स्थापन करुन त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विभाग, डिजिटल संग्रह विभाग व इंटरनेट माहिती सेवा विभाग विकसित करून सर्व जनतेला अद्ययावत माहिती सेवा देता यावी, सन 2010-11 मध्ये तत्कालिन वित्त मंत्री श्री. सुनिल तटकरे यांनी दि.25.03.2010 रोजी केलेल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये सातारा, नांदेड, जालना व रायगड या जिल्हयांमध्ये पथदर्शी सुरूवात म्हणून अशी उपकेंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालये, नांदेड आणि (घनसावंगी) जालना येथे डिजिटल उपकेंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत.
तद्नंतर, राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयांचे किमान एक डिजिटल उपकेंद्र स्थापन करण्यास दि.29.10.2012 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत निकष व कार्यपध्दती विहित केलेली आहे. त्यानुसार सदर योजना ही जिल्हास्तरीय असल्याने त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार उर्वरित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांचे डिजिटल उपकेंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक भूखंड व निधी संबंधित जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त करण्याबाबत पाठपुरावा करण्याची कार्यवाही जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालयांकडून करण्यात येत आहे.

1) डिजीटल उपकेंद्र, घनसांवगी :-
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी व जास्तीत जास्त वाचकांना वाचन सेवेचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने डिजिटल उपकेंद्र (घनसांवगी) या उपकेंद्राची स्थापना दि. 25/08/2013 रोजी करण्यात आली या उपकेंद्रात ग्रंथ , वृत्तपत्रे, नियतकालिके वाचकांसाठी उपलब्ध करुन दिली जातात या उपकेंद्रात नोंदणीकृत सभासद असून हे नियमित वाचन सेवेचा लाभ घेत असतात. या ठिकाणी महिला विभाग, बाल विभाग, संगणक विभाग, दैनिक वृत्तपत्र वाचन विभाग असे विविध विभाग आहेत. या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी येथे मुबलक प्रमाणात येत असतात आणि या उपकेंद्रातील सेवांचा लाभ घेत असतात. आज पर्यत येथील वाचन सेवेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी पोलिस, तलाठी, आर्मी, शिक्षक, आरोग्य सेवा, बॅकिंग सेवा, प्रशासकीय सेवा अशा अनेक शासकीय सेवांमध्ये रुजू झाले आहेत. या उपकेंद्रामुळे पंचक्रोशीतील अबाल वृध्द नागरिकांना खूप मोठया प्रमाणात फायदा होत असुन त्यांचा शैक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यात निश्चीतच मदत होत आहे.

2) डिजीटल उपकेंद्र, नांदेड :-
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड या कार्यालयाची स्थापना सन 2005 मध्ये झाली असून सद्या हे ग्रंथालय महानगरपालिकेचे बहुद्देशीय सांस्कृतिक संकुल, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडीयम परिसर, नांदेड या इमारती कार्यरत आहे. त्यामध्ये ग्रंथ, नियतकालिके व वृत्तपत्रे आहेत.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांचे डिजिटल उपकेंद्र तत्कालिन मा.मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते 27 फेब्रुवारी, 2012 रोजी वरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सदर डिजिटल उपकेंद्रामध्ये 30 संगणक इंटरनेट जोडणीसह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच DELNET (Developing Library Network) व MANUPATRA हे दोन डेटाबेस सुरु डेटाबेस वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेत. त्यामध्ये अनुक्रमे देश विदेशातील सभासद ग्रंथालयांमधील ग्रंथ, जर्नल्स इ. साहित्याचा समावेश आहे. -‘MANUPATRA’ या डेटाबेसमध्ये केंद्र शासनाचे सर्व कायदे, घटना समितीचे प्रोसिडिंग्जचे व्हॉल्यूम्स, 1950 पासूनचे सर्वोच्च न्यायालयाचे व सर्व उच्च न्यायालयांचे निर्णय, लॉ कमिशनचे सर्व अहवाल, केंद्र शासनाच्या खात्यांचे रुल्स इ. उपलब्ध आहेत. याशिवाय विविध जिल्हयांच्या गॅझेटीअर्स, यशंवतराव चव्हाण यांची भाषणे, बाल वाचकांसाठी विविध विषयांवरील सुमारे 100 मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील वाचनसाहित्य CD’s, VCD,s DVD’s, Talking Books उपलब्ध आहेत. सदर डिजिटल उपकेंद्रामध्ये वाचकांच्या मागणीप्रमाणे उपरोक्त डेटाबेसमधील माहितीसह इंटररनेट व प्रतिलिपी (Reprography) सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.

3) डिजीटल उपकेंद्र, अंधेरी :-
माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे माहिती मोठया प्रमाणात आणि वेगवेगळया स्वरुपात उपलब्ध होऊ लागली आहे. या माहितीचे जतन व प्रसारण करणे यासाठी राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई यांचे राज्यातील पहिले डिजिटल उपकेंद्र सन 2009 मध्ये अंधेरी येथे स्थापन करण्यात आले. तद्नंतर याच धर्तीवर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड व जालना यांचे घनसावंगी येथे डिजिटल उपकेंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षित जागेपैकी ग्रंथालयासाठी 364 चौ. फुट क्षेत्रफळ असलेल्या तीनमजली इमारतीमध्ये (चकाला-अंधेरी, घाटकोपर लिंक रोड, मुंबई) सदर डिजिटल उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.