जिल्हा ग्रंथालय समित्या

ग्रंथालय अधिनियमानुसार राज्य ग्रंथालय परिषद राज्य स्तरावर तसेच, जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा ग्रंथालय समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीच्या विकासासाठी या समितीचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी या समित्या कार्यान्वित करणे शासनाच्या विचाराधीन आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा विकास करणे आणि जिल्ह्यातील ग्रंथालयांकडे सोपविण्यात आलेली कार्ये ती योग्य प्रकारे पार पाडतात किंवा नाही याबाबत खात्री करून घेणे, या संदर्भात काही त्रुटींची टीं पूर्तता व सुधारणा अपेक्षित असतील तर त्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे ही कामे या समितीकडे सोपविण्यात आली आहेत.