कोकण विकास चाळीस कलमी कार्यक्रमांतर्गत कलम 32 नुसार शासनाने दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालयाची स्थापना
1 नोव्हेंबर, 1996 रोजी केली. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावातील तालुक्याचे ठिकाणी बाबासाहेबांची आठवण व त्यांच्या
जीवन चरित्रावर प्रकाश पडावा या हेतूने त्यांच्या स्मृती म्हणून तालुक्याच्या ठिकाणी स्थापन झालेले हे महाराष्ट्रातील एकमेव शासकीय ग्रंथालय
आहे. सदरहू ग्रंथालय संशोधन ग्रंथालय असून या ग्रंथालयात महाराष्ट्राचे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती
शाहू महाराज समाज सुधारकांचे दुर्मिळ ग्रंथ संग्रहित केलेले आहेत. सदर ग्रंथालय संशोधन ग्रंथालय असले तरी संशोधनाशिवाय इतर सामान्य वाचनाची
आवड असणाऱ्यांना या ग्रंथालयातील ग्रंथांचा, दैनिके व नियतकालिकांचा ग्रंथालयात बसून मुक्तपणे लाभ घेता येतो. तसेच जनतेमध्ये ज्ञानाचा प्रसार,
वाचनाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे ग्रंथालयासाठी कोकण कृषी विद्यापीठाकडून
दोन एकर प्राप्त झालेल्या जागेत रु. 45 लाख खर्च करून 534 चौ.मी. मध्ये भव्य वास्तू उभारण्यात आली.