राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या किंवा काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी
ग्रंथालयशास्त्र प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे आणि या वर्गामध्ये प्रवेश घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी अधिनियमान्वये ग्रंथालय संचालक यांच्या
कार्याचा भाग आहे.
ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा शासन निर्णय
ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमास मान्यता देण्यास शासन निर्णय
किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी दोन महिने कालावधीचा "ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम" संचालनालयातर्फे नियंत्रित करण्यात येतो.
राज्य ग्रंथालय संघ आणि विभागीय ग्रंथालय संघांमार्फत त्यांच्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या मदतीने जिल्हयाच्या ठिकाणी माहे एप्रिल/मे महिन्यात हे वर्ग चालविण्यास
मान्यता ग्रंथालय संचालकांमार्फत देण्यात येते. या अभ्यासक्रमाची दरवर्षी जूनमध्ये ग्रंथालय संचालनालयातर्फे परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते.
हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शालेय आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.