हस्तलिखित सल्लागार समिती

महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 कलम 9 (2) (बी) नुसार शासन निर्णय क्रमांक एलआयबी -2579/255910/(2581)/18, दिनांक 27.08.80 नुसार जून्या व मौल्यवान हस्तलिखितांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ग्रंथालय संचालनालय, मुंबई येथे हस्तलिखित ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली आहे.

हस्तलिखित सल्लागार समितीवर हस्तलिखित विषयी विशेष ज्ञान असलेल्या तज्ञ व्यक्तिंची नियुक्ती केली जाते. या समितीचे अध्यक्ष हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव असतात. तसेच ग्रंथालय संचालक हे सदस्य सचिव असतात.

सदरहू समितीची मुदत आदेश निर्गमित झाल्यापासून किंवा समितीच्या प्रथम बैठकीपासून तीन वर्षाची आहे. सदर समितीचे कार्य पुढील प्रमाणे आहे.
1. महत्वाची व दुर्मिळ हस्तलिखिते शासनास मिळवून देणे.
2. खरेदी करावयाच्या हस्तलिखितांची योग्य किंमत ठरविणे.
3. हस्तलिखितांच्या विषयी सर्व बाबींवर शासनास सल्ला देणे इत्यादी.