हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ`

शासकीय व शतायू सार्वजनिक ग्रंथालयांकडे 31 डिसेंबर 1900 पूर्वी उपलब्ध असलेल्या ग्रंथांची सूची:-

ग्रंथ हे मानवी जीवन व संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. कोणतीही व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथांना वा ते पुरविणाऱ्या ग्रंथालयांना अनन्यसाधारण महत्व असते. व्यक्ती व समाजामध्ये अंर्तबाह्य बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये असते. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रालाही अन्य क्षेत्राप्रमाणे 200 वर्षांपेक्षा अधिक गौरवशाली परंपरा आहे. राज्यात मार्च- 2014 अखेर शासन मान्यताप्राप्त 11859 ग्रंथालये असून त्यामध्ये सेवेची अविरत 100 वर्ष पूर्ण केलेल्या 83 शतायू ग्रंथालयांचा समावेश आहे. यामधील काही शतायू व शासकीय ग्रंथालयांकडे 1900 पूर्वीचे हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांच्याकडील या ज्ञानाच्या ठेव्याचे पुढील पिढीसाठी जतन करणे आवश्यक असून सदर ग्रंथसंपदा डिजिटायझेशनच्या माध्यमातून ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर भविष्यात जनतेसाठी खुली करण्याचा मानस आहे. त्यानुसार ग्रंथालय संचालनालयांतर्गत संपूर्ण कामकाजाचे व कार्यालयांचे संगणकीकरणाबाबत शासन निर्णय क्र.मराग्रं 2009/(309/09)/साशि-5, दि.5 जून 2010 रोजी निर्गमित झाला आहे. सदर शासन निर्णयांतर्गत दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते व अन्य दस्ताऐवज, साहित्य यांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याची पध्दती निश्चित करणे व सदरचे काम करुन घेण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या संदर्भात, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय व शतायू ग्रंथालयांकडे 1900 पूर्वीची उपलब्ध ग्रंथसंपदा डिजिटायझेशन करण्याच्यादृष्टीने त्यांच्याकडे विशिष्ट नमुन्यात माहितीची मागणी केली होती. याचा आढावा घेतला असता, आजमितीस शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांकडे सुमारे 10,000 च्या वर दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथांची एकत्रित सूची व डिजिटायझेशन करणे हे काम मोठे, खर्चिक व तांत्रिक स्वरुपाचे असल्याने पुढील काळात याबाबतीतील निर्णयानंतर सदर दुर्मीळ संपदेची एकत्रित सूची व डिजिटायझेशन करण्यात येऊन ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तथापि, आज रोजी संचालनालयास ज्या ग्रंथालयांकडून मागणीप्रमाणे माहिती प्राप्त झाली आहे अशा 4 शासकीय ग्रंथालयांकडे 126 हस्तलिखिते व 1600 दुर्मिळ ग्रंथ असून, 28 सार्वजनिक शतायू ग्रंथालयांकडे 488 हस्तलिखिते व 2966 दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. प्राथमिक पातळीवर वरील ग्रंथालयांकडे उपलब्ध दुर्मिळ संपदेच्या खालील ग्रंथालयनिहाय यादीतील पीडीएफ फाईल्स् वाचक, जिज्ञासू, संशोधक व अभ्यासकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपयोजकांनी गरजेनुसार अधिक माहिती व संदर्भासाठी संबंधित ग्रंथालयांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. उर्वरीत शतायू ग्रंथालयांकडे उपलब्ध दुर्मिळ साहित्यासंबंधी पाठपुरावा सुरु असून त्यांच्याकडून याद्या संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर त्याही संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील. देशपातळीवर हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन व संस्कृती विभागातंर्गत 2003 साली National Mission for Manuscript, New Delhi या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या http://www.namani.org या संकेतस्थळावर व देशात उपलब्ध हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथांच्या “Kritisampada” या इलेक्ट्रॅानिक डेटाबेसवर राज्य जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. उदा. महाराष्ट्र् राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यांतील हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथं या विषयावर काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींची नावे, पत्ता, संपर्क क्रमांक व त्यांच्याकडे उपलब्ध दुर्मिळ ग्रंथसंपदेची तपशीलवार यादी देण्यात आली आहे, संबंधितांनी हे संकेतस्थळ जरुर पहावे.



   राज्यातील 1900 पूर्वीचे उपलब्ध हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ असलेल्या शासकीय व सार्वजनिक शतायू ग्रंथालयांची तपशीलवार यादी:

   टीप :- उपयोजकांना वरील 32 ग्रंथालयांकडे उपलब्ध दुर्मिळ ग्रंथसंपदेच्या अनुवर्णानुसार यादयांच्या पीडीएफ फाईल्स पाहता येतील.


अनुक्रमांक ग्रंथालयाचे नाव व पत्ता संपर्क क्रमांक हस्तलिखिते दुर्मिळ ग्रंथ तपशीलकरीता खाली दर्शविलेल्या दुव्यावर क्लिक करा आकार
DOL(Mumbai) PDF (Marathi)
SCL(Mumbai) PDF (Marathi)
GDL(Pune) PDF (Mararthi)
GDL(Nagpur) PDF (Marathi)
Akot (Akola) PDF (Marathi)
Khamgaon (Buldana) PDF (Marathi)
Achalpur (Amarawati) PDF (Marathi)
Raje Wakatak (Washim) PDF (Marathi)
Sattyanarayan Bajaj (Vardha) PDF (Marathi)
Shevgaon (A'Nagar) PDF (Mararthi)
A'nagar PDF (Marathi)
Jamkhed (A'nagar) PDF (Marathi)
Kagal (Kolhapur) PDF (Marathi)
Aajara (Kolhapur) PDF (Marathi)
Malkapur(Kolhapur) PDF (Marathi)
Shirol (Kolhapur) PDF (Marathi)
Barshi (Solapur) PDF (Marathi)
Vita (Sangli) PDF (Marathi)
Digraj (Sangali) PDF (Marathi)
Jat (Sangli) PDF (Marathi)
Sangli Nagar PDF (Marathi)
Sangli Nagar PDF (Marathi)
Shrivardhan (Raigad) PDF (Marathi)
Pali (Raigad) PDF (Marathi)
Janjira Murud (Raigad) PDF (Marathi)
RB Kudal (Sindhudurrg) PDF (Marathi)
Vengurla (Sindhudurg) PDF (Marathi)
Thane PDF (Marathi)
Achalpur (Amrawati) PDF (Marathi)
Sangola (Solapur) PDF (Marathi)