राज्य ग्रंथालय परिषद महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, अधिनियम, 1967 च्या कलम 3 अन्वये राज्य ग्रंथालय परिषदेचे खालीलप्रमाणे सन्माननीय सदस्य आहेत. राज्य ग्रंथालय परिषदेचा कार्यकाल तीन वर्षाचा असून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा सर्वागिंण विकास करण्यासाठी राज्य ग्रंथालय परिषद शासनास सल्ला देण्याचे कार्य करीत असते. अनुक्रमांक सदस्य संख्या एकूण 1 मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, अध्यक्ष 1 2 मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, उपाध्यक्ष 1 3 सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सदस्य (पदसिध्द) 1 4 धर्मादाय आयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांपेक्षा कमी दर्जा नसलेला त्यांचा प्रतिनिधी सदस्य (पदसिध्द) 1 5 उच्च शिक्षण संचालक, पुणे, सदस्य (पदसिध्द) 1 6 ग्रंथालय संचालक, मुंबई, सदस्य सचिव 1 7 महाराष्ट्र विधानसभेने निवडून दिलेले दोन प्रतिनिधी, सदस्य 2 8 महाराष्ट्र विधानपरिषदेने निवडून दिलेला एक प्रतिनिधी सदस्य 1 9 शासनाने नियुक्त केलेले राज्यातील महानगरपालिकांचे प्रतिनिधी एक सदस्य 1 10 शासनाने नियुक्त केलेले सहा महसूल विभागनिहाय नगरपरिषदांचे सहा प्रतिनिधी. सदस्य (पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, अमरावती विभाग) 6 11 शासनाने नियुक्त केलेले सहा महसूल विभागनिहाय जिल्हा परिषदांचे सहा प्रतिनिधी. सदस्य (पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर, अमरावती विभाग) 6 12 महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, सदस्य ( पदसिध्द) 1 13 महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने विभागनिहाय नामनिर्देशित केलेले सहा प्रतिनिधी. सदस्य (पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर, अमरावती विभाग) 6 14 मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, सदस्य ( पदसिध्द) 1 15 राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले ग्रंथालय क्षेत्रातील जाणकार रुचि असलेले व अनुभवी सदस्य चार सदस्य 4 एकूण 34