कोलकत्ताच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने 1972 साली झाली. देशातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा
सार्वत्रिक विकास करणे हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिष्ठानच्या कामकाजाच्या दृष्टीने सोय व्हावी व प्रतिष्ठानच्या योजनांची योग्यरित्या
अमंलबजावणी आणि त्यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान राज्य ग्रंथालय नियोजन समिती नियुक्त करण्यात येते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव हे ह्या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात. ग्रंथालय संचालक हे पदसिध्द निमंत्रक असतात. प्रतिष्ठानच्या
अध्यक्षांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठानचे संचालक, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व अन्य तज्ञ शासन नियुक्त सदस्य असे एकूण 7 सदस्य या समितीमध्ये समाविष्ट
असतात. या समितीतंर्गत सदस्यांची ग्रंथ निवडीसाठी एक उपसमितीही नियुक्त करण्यात येते. त्या उपसमितीचे अध्यक्ष संचालक असतात.