राज्य ग्रंथालय नियोजन समिती

कोलकत्ताच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने 1972 साली झाली. देशातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा सार्वत्रिक विकास करणे हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे.

प्रतिष्ठानची "ग्रंथभेट" ही एक योजना असून, या योजनेतून ग्रंथखरेदी करुन त्यांचे निवडक सार्वजनिक ग्रंथालयांना वितरण केले जाते. मराठी भाषेत प्रतिवर्षी प्रकाशित झालेले सर्व ग्रंथ राज्य ग्रंथालय नियोजन समितीपुढे विचारार्थ ठेवण्यात येतात. या सर्व ग्रंथांतून निवडक ग्रंथांची शिफारस करणे अडचणीचे होते. निवड प्रक्रियेचे काम सुलभपणे पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन समितीच्या उपसमितीची रचना असते.
1. अध्यक्ष
2. सदस्य - 4
3. सदस्य सचिव
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक तत्वानूसार राज्य ग्रंथालय समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य असतात.