संचालकांचा संदेश

ग्रंथालय संचालकांचा संदेश

मी किरण गंगाधर धांडोरे, ग्रंथालय संचालक म्हणून सर्वप्रथम वाचकांचे स्वागत करतो. महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी अधिनियमान्वये ग्रंथालय संचालनालयाची स्थापना 2 मे, 1968 रोजी करण्यात आली. “ग्रंथालय हीच ज्ञानाची सदावर्ते” या घोषवाक्याप्रमाणेच ग्रंथालय व माहिती सेवांच्या सहाय्याने महाराष्ट्रातील सर्वस्तरातील लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहचविण्याच्या दृष्टीने ग्रंथालय संचालनालय प्रयत्नशील आहे. भारतातील सर्वाधिक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये म्हणून राज्याचा लौकीक आहे, हे त्याचेच द्योतक आहे.

महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ ही राज्याच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरीता वाचन संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करुन ग्रंथालय व माहिती सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा बौध्दीक, सामाजिक तथा सर्वांगिण विकास करण्याकरीता ग्रंथालय संचालनालय कटिबध्द आहे. तसेच राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन ग्रंथालय व माहिती सेवांचा विकास करुन त्याचा लाभ समाजातील सर्वस्तरांमधील लोकांपर्यत पोहचविण्यास प्रधान्य देणे. 21 व्या शतकातील अपेक्षित ज्ञानाधिष्ठीत/प्रज्ञावंत समाजाची निर्मिती करण्याकरीता, वाचन संस्कृतीची चळवळ जनमानसात रुजविण्यासाठी महाराष्ट्रातील सुजाण वाचक, ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथालय सेवक व ग्रंथालय संघ यांचे सहकार्य राहील असा मला विश्वास वाटतो.

ग्रंथालय चळवळ वाढीसाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा व साधनांची उपलब्धता व त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याकरीता मा.मंत्री महोदय, मा. राज्यमंत्री व मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभेलच अशी आशा व्यक्त करतो.

 • भारत सरकार
 • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
 • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
 • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
 • रोजगार बातम्या
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग
 • डिजिटल भारत
 • आधार कार्ड
 • आपले सरकार
 • डिजिटल लॉकर
 • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली