उद्दिष्टे

ग्रंथालय संचालनालयाची उद्दिष्टे:-

व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचेमहत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती,ज्ञान, मनोरंजन आणिजिज्ञासापूर्तीचेउत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे.म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्रम्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे.
शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून ``सार्वजनिकग्रंथालय प्रणाली’’ विकसित करणे अपरिहार्य आहे. राज्यातील ग्रामीण आणिशहरी विभागातील जनतेला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातीलविविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठीसार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने ``महाराष्ट्रसार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, 1967’’ मंजूर केला आहे. या अधिनियमान्वयेराज्यातील जनतेच्या वाचनाच्या आवडीची जोपासना करणे आणि सार्वजनिक ग्रंथालयप्रणालीचा विकास करून "गाव तेथे ग्रंथालय"हे घोषवाक्य टप्प्याटप्प्यानेअंमलात आणण्याचे, जनकल्याणकारी राज्य म्हणून शासनाचे उद्दीष्ट आहे.
महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन व विकास करणे हे ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठीग्रंथालय सेवेच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून शासनअंमलात आणत आहे.
वरील प्रमुख उद्ष्टिासह ग्रंथालय संचालनालयाची इतर उद्दिष्टे खालीप्रमाणे:-
1) वाचनाची अभिरूची निर्माण करण्यास ग्रंथालय वाढीस प्रोत्साहन देणे.
2) "गाव तेथे ग्रंथालय" संकल्पना जलद गतीने अंमलात आणणे.
3) प्रचलित ग्रंथालयांचा सर्वांगिण विकास साधणे.
4) ग्रंथालयांना आधुनिकतेची जोड देऊन संगणकीकरण करणे.
5) ई-प्रशासन आमलात आणणे
6) ग्रंथालयाच्या वाचक वृध्दीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे इ.

 • भारत सरकार
 • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
 • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
 • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
 • रोजगार बातम्या
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग
 • डिजिटल भारत
 • आधार कार्ड
 • आपले सरकार
 • डिजिटल लॉकर
 • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली